Download App

Maharashtra Legislative Assembly : २०१९ पासून पाच आमदारांचा मृत्यू… त्यातील तिघांच्या पत्नी विधानसभेत!

पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या मुलगा भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव झाला तर देगलूर पोटनिकाडणुकीत रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचा मुलगा जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे विजयी झाले आहेत.

१४ व्या विधानसभेत सन २०१९ नंतर एकूण पाच आमदारांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तर या मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या पहिल्या महिला आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत. तर मुंबईतील अंधेरी मतदार संघात शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या दुसऱ्या तर नुकताच चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या तिसऱ्या महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या आहेत.

Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

रावसाहेब अंतापुरकर-जितेश अंतापूरकर

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन झाल्याने तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली. तिथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांच्याच मुलगा जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. २०२१ मध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झाला आहे.

भारत भालके-भगीरथ भालके

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोना महामारीच्या काळात निधन झाले. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली. अगदी अटीतटीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे विजयी झाले. साधारणपणे सव्वाचार हजारांच्या मताने अवताडे यांचा विजय झाला.

चंद्रकांत जाधव-जयश्री जाधव

कोल्हापूर उत्तर या मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नोव्हेंबर २०२१ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिथे २०२२ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यात काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा विजय झाला. सन २०१९ च्या १४ व्या विधानसभेत गेलेल्या जयश्री जाधव या पहिल्याच महिला उमदेवार आहेत.

रमेश लटके-ऋतुजा लटके

मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाले. त्यामुळे अंधेरी मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवार दिली. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे.

लक्ष्मण जगताप-अश्विनी जगताप

चिंचवड विधानसभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे येथे २६ फेब्रुवारी २०२३ला पोटनिवडणूक झाली. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यात अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत.

Tags

follow us