Download App

खेळाडूंची फटकेबाजी बघता-बघता गहुंजेवर रंगणार शाह-पवारांचे राजकारण

MPL Final 2023 :  महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा फायनल सामना आज रंगणार आहे. पुण्यातील गहुंजे मैदानावर ही लढत होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी स्टाफकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. हा सामना आणखी एका कारणाने चर्चत आला आहे. याचे कारण हा सामना पाहण्यासाठी दिग्गज लोकांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. आजचा अंतिम सामना हा रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स या दोन संघात रंगणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित पवार हे प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष झाले असून त्यांनी ही लीग सुरु केली आहे. आज या लीगची फायनल रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे सचिव जय शाह, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

या सामन्यासाठी एवढी दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याने राजकीय चर्चा होणारच. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. जय शाह आणि शरद पवार हे दोन्ही जण हा सामना पाहण्यासाठी एकत्र येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार हे देखील हा सामन्या पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहे.

या अगोदर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ही नेतेमंडळी एकत्र आली होती. तसेच तेव्हा ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर अंधेरेची पोटनिवडणुक ही बिनविरोध झाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यानंतर राजकीय क्षेत्रात काही घडामोड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us