Download App

मोदींसाठी मनसेचं इंजिन मैदानात पण, मोहोळ अन् सुनेत्रा पवारांच्या पत्रकांमुळे मनसैनिक कन्फ्युज….

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पाठिंबा जाहीर करताना राज ठाकरेंनी मोदींचं नाव घेतलं. यानंतर भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागत होत असताना पुण्यातूनच दोन परस्पर विरोधी बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे मनसैनिक गोंधळात पडले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र सैनिक उद्या मुंबईमध्ये बैठकीला जाणार आहेत. राज ठाकरे उद्या मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महायुतीच्या प्रचाराबाबत उद्या भूमिका ठरणार असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. तर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सु्नेत्रा पवार यांना तिकीट दिले आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहेत. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

Raj Thackeray: शिंदे-फडणवीस म्हणत होते म्हणून.. अमित शाहंच्या भेटीबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

राज ठाकरेंच्या या भूमिकेचे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. दुसरीकडे महायुतीच्या बॅनर्सवर राज ठाकरेंचेही फोटो झळकू लागले. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त पक्षाने तयार केलेल्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरेंचाही फोटो आहे. मनसेचा पाठिंबा मिळाल्यानंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती महायुतीसाठी आणखी अनुकूल होईल असेही सांगितले जात आहे. महायुतीसाठी अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली असताना पुण्यात मात्र वेगळाच प्रकार घडला आहे.

मोहोळोंच्या पत्रकात राज ठाकरे गायब

पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरे यांचा फोटोच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांत गोंधळ निर्माण झाला आहे. मनसेचा महायुतीला पाठिंबा आहे का? असेल तर मोहोळ यांच्या प्रचार पत्रकांवर राज ठाकरेंचा फोटो का नाही? प्रचार पत्रकावर फोटो न वापरण्याचं कारण काय? असे प्रश्न मनसैनिकांना पडले आहेत.

Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर

follow us