Download App

नीरा लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

Nira Lonand Accident : भरधाव वेगातील एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे लोणंद-नीरा (Nira Lonand Accident) रस्त्यावर घडली. हे तिघे तरू पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील आहेत. या तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात घेते…राऊतांची टीका

ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर) अशी या अपघातातील मयतांची नावे आहेत.

लोणंद-निरो रोडवर मंगळवेढाकडून पुण्याकडे निघालेली बस लोणंदकडे निघाली होती. त्याचवेळी हे तिघेजण दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगातील बस आणि दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीवरील तिघेही जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी येथील वाहतूक सुरळीत केली. या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते.

संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले…

दरम्यान, अपघातात तिघे मुले गेल्याची वार्ता गावात पसरली. गावात ग्रामदैवत हनुमानाचा जन्मोत्सव सुरू होता. त्यात ही बातमी आल्याने शोककळा पसरली आणि येथील यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तिघेही मुले त्यांच्या घरच्यांना एकुलती एकच होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या मुलांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags

follow us