पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट; प्रा. सचिन सानप यांना प्राध्यापक संघटनेचा पाठिंबा, संघटनेच्या पत्राची जोरदार चर्चा!

Sachin Sanap Pune Teachers Constituency Election: पुणे शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत प्रा. सचिन सानप यांना ‘स्पुक्टो’ने पाठिंबा जाहीर केला आहे.

Sachin Sanap Pune Teachers Constituency Election

Sachin Sanap Pune Teachers Constituency Election: पुणे : पुणे शिक्षक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अशातच प्राध्यापक संघटनेने पुण्यातील उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिक्षक निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. पुणे शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत प्रा. सचिन सानप यांना ‘स्पुक्टो’ने पाठिंबा जाहीर केला आहे.

लिस्टिंग होताच जिओ बनणार भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी; कोणत्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकणार ?

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर तसेच माजी आमदार दत्तात्रय सावंत, बी. पी. रोंगे यांच्यासह 30 उमेदवार शिक्षक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सचिन सानप हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून लढवत आहेत. अपक्ष असून प्राध्यापक संघटनेने सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

पुण्यात आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे संकट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने (स्पुक्टो) सानप यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणी सभेत सानप यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून याबाबतचे अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सुटे मसाले विक्री करण्यास बंदी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे नवे आदेश

गेल्या दोन दिवसांपासून सानप यांना शिवसेनेकडून पाठिंबा मिळत असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर याबाबत बैठक झाल्याची चर्चा आहे. प्राध्यापक संघटनेने सानप यांना पाठिंबा दिल्याने मतदारसंघात जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

follow us