Jejuri : आमच्या सगळ्या नियुक्त्या या घटनेनुसारच झाल्या असून यामध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या आहेत, असे स्पष्ट करत आंदोलन करणारे लोक खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी केला. विश्वस्तांनी आज पत्रकार परिषद घेत विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणार जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन या सर्व विषयांवर आज या नव्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.
विश्वस्तपदाच्या या सगळ्या नियुक्त्या कायदेशीररित्या पारदर्शक पद्धतीने झाल्या आहे. या सगळ्या कार्यवाहीसाठी 11 महिने 13 दिवसांचा कालावध लागला आहे. या नियुक्त्या पूर्णपणे कायदेशीर झाल्या आहेत, असे विश्वस्त पांडुरंग थोरवे यांनी सांगितले. नवनियुक्त विश्वस्त हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून धर्मदाय आयुक्तांकडे आम्ही कुठलीही शिफारस केली नाही. आंदोलन करणारी काही व्यक्ती खोटी अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील या विश्वस्तांनी केला.
Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअॅलिटी नेमकी काय?
दरम्यान, गेल्या तेरा दिवसांपासून जेजुरी गावामध्ये ग्रामस्थांनी नव्या विश्वस्त निवडी विरोधात आंदोलन सुरू केले असून ही निवड बेकायदेशीर असून बाहेरचे लोक विश्वस्त पदावर घेतले आहेत असा आरोप करत सर्व ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. आज याच आंदोलनाविषयी देवस्थानाच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी आपलं स्पष्टीकरण दिल आहे.
काय आहे नेमका वाद ?
मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवरील विश्वस्तांच्या यापूर्वी नेमणुका 2017 साली झाल्या होत्या. डिसेंबर 2022 मध्ये सर्वांची मुदत संपली. त्यानंतर नुकतचं विश्वस्तपदावर नव्याने 7 जणांची निवड करण्यात आली आहे. नवीन विश्वस्तांच्या पदांसाठी सुमारे साडेतीनशे अर्ज आले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर पुणे सहधर्मदाय कार्यालयाचे सहआयुक्त सुधीर कुमार बुक्के यांनी सात जणांची निवड जाहीर केली.
याच घोषणेनंतर वादाला सुरुवात झाली आहे. जेजुरीकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. पदभार स्विकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांच्या विरोधात स्थानिकांनी जोरदार घोषणा दिल्या. मोर्चे, आंदोलनांना सुरुवात झाली. या विश्वस्त निवडीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. 7 विश्वस्तांपैकी 5 जण बाहेरचे आहेत. तसेच हे सर्व जण एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. यातून जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांना डावण्यात आलं आहे, असा दावा स्थानिकांचा आहे. त्यावरुन नाराजीचा सूर उमटला आहे.