Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, महायुतीची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील 48 मतदारसंघांचे चित्र स्पष्ट करू अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Harshvardhan Patil : अजित पवार गटाकडून धमक्या, हर्षवर्धन पाटील यांचा गंभीर आरोप
यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही चांगलेच फटकारले. जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्यावररून अजित पवार कमालीचे नाराज आहेत. त्यांनी या नाराजीच्या सुरातच प्रसारमाध्यमांना फटकारले. तुम्हीच लोकांनी बातम्या चालवल्या होत्या की राष्ट्रवादीला तीनच जागा दिल्या. इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्या जातात. यातून तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करता. ज्या चॅनेलने ती बातमी दिली ते. कोणतीच माहिती घेत नाही. बातम्यांचा विपर्यास करतात. असं करू नका काय वस्तुस्थिती असेल ती सांगा, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात 8 उमेदवारांची घोषणा केली. या घडामोडीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. प्रकाश आंबेडकर राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांची राज्यात मोठी ताकदही आहे. मागील वेळी आपण पाहिलं. वंचित आघाडीमुळे आघाडीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. वंचित आघाडीच्या उमेदवारांनी लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. आता त्यांनी कुणाबरोबर आघाडी करावी हे त्यांनी ठरवावं, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, दाखला देत आव्हाडांचा आरोप