अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं

Dhananjay Munde : विधीमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निकालानंतर पुण्यात युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटावर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्याविरोधात (Ajit Pawar) बोलल्यास आता राष्ट्रवादीचे तरुण शांत बसणार नाहीत, […]

अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं

अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं

Dhananjay Munde : विधीमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निकालानंतर पुण्यात युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटावर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्याविरोधात (Ajit Pawar) बोलल्यास आता राष्ट्रवादीचे तरुण शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी या मेळाव्याच्या व्यासपीठावरून दिला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन हाती घेतलं आहे. 2024 साली आपल्याला दादांनी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे राहणाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पाडली पाहिजे. तेव्हाच अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. अजितदादांनी आम्हाला उभं केलं. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार झालो. सर्व पक्षांचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे अजितदादांनी निवडून दिले आहेत, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

मुंडे पुढे म्हणाले, 2 जुलैच्या निर्णयानंतर 5 जुलैच्या सभेत खऱ्या अर्थाने लोकशाही व्यासपीठावर दिसली तशी ती आजही दिसत आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचं आता काय होणार याची चर्चा 6 फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे होती. पण, या दिवशी निर्णय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं. आता येथून पुढे अजित पर्व सुरू झालं आहे.

नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा…अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!

अजितदादांविरोधात बोलल्यास शिंगावर घेऊ

अजित पवार कायमच पक्ष नेतृत्वासाठी झिजत राहिले. या झिजलेल्या चंदनाचे अनेकांनी विजयी तिलक लावले. ते विजयी झालेले आणि तिकडे राहिलेले कष्टीवादी अजित पवारांच्या विरोधात बोलणार असतील तर त्यांना शिंगावर घेण्याची तयारी आता करावी लागणार आहे. इथून पुढं अजित पवार आणि इतर नेत्यांवर मर्यादा सोडून बोलल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण शांत बसणार नाहीत, असा इशारा धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना दिला.

Exit mobile version