हुश्श! कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या अखेर जेरबंद; 48 तासांनंतर पिंजऱ्यात अडकला

Pune News : कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या (Pune News) अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमांनंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी 9 पिंजरे लावण्यात आले होते. यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. काल रात्री 9 वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. कात्रजच्या […]

हुश्श! कात्रज प्राणी राज्यात बिबट्यांची दहशत वाढली; बिबट्यांना रोखण्यासाठी आमदार तांबेंनी केली 'ही' मागणी

leopards

Pune News : कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या (Pune News) अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमांनंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी 9 पिंजरे लावण्यात आले होते. यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. काल रात्री 9 वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले.

कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता. प्राणीसंग्रहालयातील एका ठिकाणी बिबट्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र 4 मार्चला सकाळी पिंजऱ्यात बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

नगर शहरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, आठ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

त्यानंतर विलगीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या दिसला होता. तो झाडीत होता त्यामुळे डार्ट मारून त्याला बेशुद्ध करता येत नव्हते. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले होते. काही वेळातच त्याला पकडण्यात आले.  बिबट्या निवारा केंद्र किंवा प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळून जातात. अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे अनेकदा मानवी वस्तीत येतात. पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले केल्याच्या घटना नेहमीच होत आहेत.

Exit mobile version