नगर शहरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, आठ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
Ahmednagar : नगरमधील केडगाव उपनगरमध्ये (Kedgaon )सकाळपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद केला आहे. काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या (Leopard)आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरु होती. सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी (Forest Department)त्याच्या शोधात होते.
त्यानंतर सकाळी साडेआठ नऊनंतर बिबट्या दिसून आला. एका कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच बिबट्याचे व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर (Social media)व्हायरल झाले. केडगाव आणि नगर शहर परिसरात एकच खळबळ उडाली. पण आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तो बिबट्या पकडण्यात यश आलं आहे.
कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ आणि एका व्यक्तीवरील हल्ल्याचा थरार केडगावकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. नगर शहरातील केडगाव परिसरातील अंबिकानगर भागात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. केडगावातील अंबिकानगर परिसरात बिबट्या आढळला. या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. मात्र हा व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून निसटला. परंतु, हा व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
आज बिबट्या अंबिकानगर भागात काही लोकांना दिसला. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती लोकांनी वनविभागाला दिली. यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
केडगावमध्ये नागरिकांची गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणी आल्या. शेवटी शूटरने निशाणा साधला आणि बेशुद्ध केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चार पाच वेगवगेळ्या ठिकाणी पिंजरे लावले होते. शेवटी बिबट्याला बेशुद्ध करुन त्याला पकडण्यात यश आलं आहे.