कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात

कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात

Raj Thackeray On Sharad Pawar : आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातींमध्ये विभागले आहेत. या महापुरुषांवरचं राजकारण (politics) आत्ता फक्त सुरु आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचं नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. ते डोंबिवलीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

‘मूर्ख आहेत त्या मुली ज्या डेटवर…’, नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन काय बोलून गेल्या?

राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून रायगडावर तुतारी या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हृदयद्रावक घटना! टॅक्टर ट्रॉली तलावात पलटी झाल्यानं २२ जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने उत्तरप्रदेश हादरलं

या निमित्ताने आता हे चिन्ह तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता त्या कार्यक्रमावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी एकदा मागे त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत.

शिव छत्रपतींचं नाव घेतल्यानं मुस्लिम बांधवांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली. आणि आता त्यांना आठवलं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज