Download App

N D Mahanor : ‘अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला’… महानोरांच्या निधनाने शरद पवार भावूक

ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महानोर यांच्या निधनाने व्यथित झाले आहेत. त्यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत या निसर्गकवीला श्रद्धांजली वाहिली.

पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार म्हणतात, माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों चे बालपण कष्टात गेले पण, कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.

ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो

Tags

follow us