Download App

पुण्यात हायहोल्टेज ड्रामा! काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात, मोदींच्या दौऱ्याविरोधात सामाजिक संघटनाही आक्रमक

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आ पुण्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापल आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार आंदोलन केले. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस नेते मोहन जोशी यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

मोदींच्या पुणे दौऱ्याला पुण्यातील विविध सामाजिक संघटना तसेच काँग्रेसच्यावतीने टोकाचा विरोध केला जात आहे. काळे कपडे परिधान करत हातात काळे झेंडे घेऊन मोदींना विरोध करण्यात येत आहे. या विरोध आंदोलनात काँग्रेसह इंडिया फ्रंट, युवक क्रांती दल, हमाल पंचायत आणि सामाजिक संघटनांनी आज सकाळपासूनच पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलात कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोदी गो बॅकच्या घोषणा दणाणल्या

या आंदोलनात विरोधी पक्षांनी मोदींच्या पुणे दौऱ्याचा कडाडून विरोध केला. तसेच मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या हातात मन की बात मत करो, काम की बात करो अशा घोषणा लिहीलेले फलक होते.

पंतप्रधान चले जाव, आधी मणिपुरला जा!

मागील साडे तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या घटनांनी जळत आहे. येथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. या घटनेने संतप्त झालेल्या पुण्यातील नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा विरोध केला. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यास विरोधकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असताना मणिपूर नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी होत मणिपूर राज्यातील विदारक घटनेचा निषेध करीत नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांच्या हातात पकडणं, आमच्या हातात निषेध करणं – सप्तर्षी

मोदींना विरोध होईल म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हीच हुकूमशाहीची चाहूल आहे. याला आमच विरोध आहे. आमच्या युवक क्रांती दलाला पोलिसांच्या नोटिसा आल्या. काही कार्यकर्त्यांना तर पोलिसांनी रात्रीच अडवून ठेवलं. पण, आमच्या हातात निषेध करणं आहे. निषेधच झाला नाही तर पुढे काहीच शिल्लक राहणार नाही, असे माजी आमदार कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

Tags

follow us