Download App

कसब्यात घराघरात पैशांची पाकिटे कुणी फेकली ? ; संजय राऊतांचा भाजपला सवाल

पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. या निवडणुकीत पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ते मतदारांना आजिबात आवडले नाही. त्यांनी हे दाखवून दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कसब्यात घराघरात पैशांची पाकिटे फेकली गेली. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर साधा माणूस आहे मग हे कुणी केले ?, असा सवाल राऊत यांनी केला.

हेही वाचा : विधानसभा दोनशे, लोकसभेच्या 40 जागा आमच्याच; राऊतांनी सांगितले विजयाचे गणित

कसब्याचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. चिंचवडमधील भाजपचा विजय कुणीच मान्य करणार नाही. या मतदारसंघात उमेदवार निवडताना काळजी घेतली असती तर निकाल निश्चितच वेगळा राहिला असता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी हा विजय कुणीच मान्य करणार नाही. कारण चिंचवडमध्ये भाजप नाही तर जगताप पॅटर्न चालतो, हे याआधीही पहायला मिळाले आहे. आताही तेच दिसून येत असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांचे निकालांवरून  सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  या निवडणुकांमुळे आघाडीला बळ मिळाले आहे. तर भाजप बॅकफूटवर आहे. कसब्यात मागील 28 वर्षांपासून भाजपचाच उमेदवार निवडून येत होता. आता येथे काँग्रेसचे राज्य आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.  तर दुसरीकडे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्यामुळे भाजपचा विजय झाला आहे.

बंडखोरी नसती तर भाजपला ही निवडणूक जिंकणे सोपे नव्हते अशी परिस्थिती होती. कारण, विरोधातील दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर ही मते भाजप उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा जास्त भरत होती.

https://www.youtube.com/watch?v=2dL8FXy68Mc

Tags

follow us