Download App

धक्कादायक ! महिलेवर बंदूक रोखत सराफा दुकानात दरोडा; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime : तोंडाला मास्क लावून आलेल्या बंदूकधारी दरोडेखोरांनी सराफा दुकानातील महिलेवर बंदूक रोखत दुकानातील दागिने घेऊन पोबारा केला. ही थरारक घटना बारामती तालुक्यातील सुपे या गावात घडली. येथील एका महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानातील चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी यातील तीनही आरोपींना सध्या ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली किया गाडी,  दोन पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झालेत, ठोंबरे-पाटील कडाडल्या…

सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात निळा शर्ट घातलेला एक व्यक्ती दुकानात आला. अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने तो बोलत असताना काही वेळातच या व्यक्तीचे आणखी तीन साथीदारांनी दुकानात प्रवेश केला आणि काही समजण्याच्या आतच दुकानात प्रवेश केलेले हे तिघेजण बंदूक काढून येथील महिलेवर रोखली. त्यानंतर सोबत आणलेल्या बॅगेत दुकानातील सोन्याचे दागिने भरून हे चोरटे पसार झाले.

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

महालक्ष्मी ज्वेलर्स सराफा दुकान लूटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र सुपे ग्रामस्थांच्या धाडसामुळे त्याच दिवशी एका चोरट्याला पकडण्यात यश आले. या दुकानातून तब्बल 12 लाख रुपये किमतीचे दागिने पळवले होते. मात्र त्यातील एक पिशवी त्याठिकाणी सोडून त्यांना पळ काढावा लागला होता. नागरिकांनी प्रसंगावधान दाखविल्याने पोलिसांनाही मोठी मदत झाली. सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी कार, दोन पिस्तूल आणि 24 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Tags

follow us