Download App

Pune News : ठाकरे गटाला धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

Pune News : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार झटके बसत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यात (Pune) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात उद्धव ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. मात्र त्याआधीच हा धक्का बसला आहे.

लव्ह जिहाद खोटं, असं काही नसतं, अबू आझमींचं चॅलेंज नितेश राणेंनी स्वीकारलं

देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. देशपांडे हे तीन वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांची मे 2022 मध्ये हकालपट्टी केली होती. सन 2000-2012 या कालावधीत ते कोथरूड भागातून नगरसेवक होते. मंत्री चंद्रकांत पाटील या भागाचे आमदार आहेत. देशपांडे 2008-2009 या काळात पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

जीवे मारण्याच्या धमक्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं; शिंदे गटाकडून युक्तिवाद

देशपांडे यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. यानंतर भाजप त्यांना काय जबाबदारी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,  नुकत्याच झालेल्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकांची बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येत असतानाच सुरुवातीलाच महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

follow us