Vasant More : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल (Vasant More) मोठा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमचा (MNS) जय महाराष्ट्र केला. यानंतर राजकारणात वसंत मोरे पुढं काय करणार? कोणत्या पक्षात जाणार? लोकसभा निवडणूक लढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. आता या चर्चांवर वसंत मोरे यांनीच भाष्य करत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच राजीनामा दिल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही फोन आल्याची माहिती माध्यमांना दिली.
वसंत मोरे म्हणाले, राजीनामा दिल्यानंतर मला मनसेमधील अनेक नेत्यांचे फोन आले. परंतु, आता मी परतीचे दोर कापलेले आहेत. मला खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचेही फोन आले होते. संजय राऊत म्हणाले तुम्ही सक्षम आहेत आणि योग्य निर्णय घ्या. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मित्र म्हणून काल फोन केला होता. परंतु, सध्या मी कोणतीच राजकीय भूमिका जाहीर करणार नाही.
Vasant More : राजसाहेबांची वेळ मागितली होती पण..,; नाराजीची कहाणी सांगताना मोरे हुंदके देत रडले
मला ज्या त्रासातून पक्ष सोडावा लागला. त्यानंतरही ते लोक शहाणे झालेले नाहीत. आता सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना रात्री अपरात्री फोन करून धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींतून स्थिर झाल्यानंतर मी माझी राजकीय भूमिका दोन दिवसांनंतर जाहीर करेन.
मी राजीनामा दिल्यानंतर एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर राजसाहेबांचा फोन आला होता. त्या पदाधिकाऱ्याला मी हात जोडून इतकंच सांगितलं की साहेबांचा फोन मला देऊ नको. राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंशी बोलून मी त्यांना दुखावू इच्छित नाही .
दरम्यान, वसंत मोरे यांच्याशी दोन पक्षांनी संपर्क साधला आहे. याची माहिती मोरेंनी दिली. काँग्रेसने मला विचारणा केली आहे. माजी आमदार मोहन जोशी यांनी मला फोन केला होता. उद्धवछ ठाकरे गटानेही ऑफर दिली आहे. पुणे लोकसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणारच आहे. निवडणूक कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढणार हे देखील लवकरच जाहीर करणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
वसंत मोरे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार? चर्चा तर तशाच होताहेत…