Download App

फडणवीसांनी चहापानावरच साधला डाव; सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुख माने अजितदादांच्या गोटात

Baramati Lok Sabha 2024 : राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा (Baramati Lok Sabha 2024) सुरू आहे. या मतदारंसघात महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे लढत अटीतटीची होणार आहेत. याची जाणीव दोन्ही बाजूच्या नेत्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीआधी जितकं बेरजेचं राजकारण करता येईल तितकं केलं जात आहे. यामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारप्रमुखांनाच गळाला लावले आहेत. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) इंदापुरात येऊन चहापानाचे निमित्त करत प्रवीण माने यांची भेट घेतली. त्यानंतर आज प्रवीण माने यांनी थेट पत्रकार परिषद घेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर करून टाकले.

महाविकास आघाडीला ‘वंचित’चा एवढा धसका का? इतिहास पहाच!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, इंदापूर विकासासाठी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहोत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती प्रवीण माने यांनी दिली. आम्ही आजपासूनच महायुतीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहोत, असेही प्रवीण माने यांनी सांगितले.

दरम्यान, प्रवीण माने यांनी आताच हा निर्णय का घेतला याच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत. याआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. यातील एक ठळक घडामोड म्हणजे देवेंद्र फडणवीसांची भेट. दोन दिवसांपूर्वी फडणवीस इंदापुरात आले होते. येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यानंतर फडणवीस हर्षवर्धन पाटील यांना घेऊन प्रवीण माने यांच्या घरी गेले होते. यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना काय चर्चा झाली याबद्दल विचारले.

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, की प्रवीण माने आमचे मित्र आहेत. चहापानासाठी त्यांनी बोलावले होते. आज त्यांच्या घरी चहापानासाठी गेलो होतो असे उत्तर दिले. हे चहापान नेमकं काय होतं याचा खुलासा त्यावेळी झालं नव्हतं. आता मात्र आज याचं उत्तर मिळालं आहे. आज प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेत बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.

Vijay Shivtare : पुरंदरचा ‘मांडवली सम्राट’ बारामतीच्या मैदानातून माघार घेताच शिवतारे टार्गेट; पत्र व्हायरल

आधी महाविकास आघाडीचा प्रचार केला आता पक्षच बदलला 

दरम्यान, बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रवीण माने प्रचारात होते. इंदापूर परिसरातील प्रचाराचे नियोजन त्यांनीच केले होते. इंदापुरात सुप्रिया सुळेंना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा निश्चय मानेंनी केला होता. परंतु, मागील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी या भागात घडल्या. त्याचा परिणाम आज प्रवीण माने यांच्या पक्ष बदलात दिसून आला.

 

follow us