वडिलांसाठी मुलगी बनली आशेचा किरण! आमदार विजय शिवतारेंना मुलीने किडनी दान केली…

बापासाठी लेकीने आपली किडनी दान केल्याचे समोर आले आहे. आमदार विजय शिवतारे यांना मुलगी ममता शिवतारे यांनी किडनी दान दिली आहे.

Vijay Shivatare

Vijay Shivatare

Mla Vijay Shivtare : आपल्या लेकीसाठी बाप जिवाचं रान करत असतो. तिच्यावर चांगले संस्कार करतो. आता बापासाठी लेकीने आपली किडनी दान केल्याचे समोर आले आहे. आमदार विजय शिवतारे (Mla Vijay Shivtare) यांना मुलगी ममता शिवतारे यांनी किडनी दान दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या बाप लेकीच्या नात्याची चर्चा होत आहे.

12 नावं, 11 महिला आणि कोट्यवधींची लूट : कलीयुगातील ‘लखोबा लोखंडे’

पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची अनेक वर्षांपासून किडनी फेल झाल्यामुळे ते डायलिसिसवर होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अशा वेळेस त्यांची मुलगी ममता शिवतारे त्यांच्यासाठी आशेचा किरण बनलीयं. ममता यांनी विजय शिवतारे यांना किडनी दान देण्याचा निर्णय घेतलायं. एक डॉक्टर, एक कर्तव्यदक्ष मुलगी आणि आता वडिलांना नवजीवन देणारी देवदूत म्हणून ममता यांचे कौतुक होत आहे.

2027 ची जनगणना ठरणार ऐतिहासिक; लिव्ह-इन जोडप्यांची गणना आता विवाहितांमध्ये होणार

आपल्या वडिलांच्या जीवनासाठी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेत ममता यांनी केवळ कर्तव्य नाही, तर अपार प्रेमाची पराकाष्ठा दाखवली आहे. मुंबईत आज किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एका लेकीचा हा त्याग, केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण पुरंदर आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विजय शिवतारे हे पुरंदर मतदारसंघाचे शिवसेना आमदार असून ‘बापू’ म्हणूनही ओळखले जातात. २००९ आणि २०१४ मध्ये ते निवडून आले होते. २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी यापूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

Exit mobile version