Source Code Theft Case : नगर तसेच पुण्यातील नामांकित PRM सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड या आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभाग तसेच नगर विकास विभागाची मुख्य आर्थिक प्रणालीचा सोर्स कोड चोरल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनीचा मालक आणि prm कंपनीचे माजी कर्मचारी अश्या सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या 4 ते 5 महिन्यापासून फरार असलेल्या सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार प्रदीप पाथरीकर (Mandar Pathrikar) या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबई येथे पळून गेला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवीन हेल्थ अपडेटसह ॲपल स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स-
या प्रकरणातील काही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सायबर पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून सोर्स कोड चोरीमागील नेमका कट, चोरी करण्यात आलेल्या डेटाचा वापर कुठे आणि कशासाठी करण्यात आला तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली आहे.
