MP Supriya Sule Speak On Dinanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी राजकारण न करता कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरण्यात आलं. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भूमिका मांडलीयं.
शेअर बाजारानंतर केंद्र सरकारने जनतेला दिला धक्का! पेट्रोल अन् डिझेल महागणार?; GR निघाला
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्वसामान्य माणसाने टॅक्स भरला नाही तर बॅन्ड वाजवता, इथं महापालिकेने हॉस्पिटलपुढे काहीही केलं नाही. माझ्या पत्रकार परिषदेनंतर मी भिसे कुटुंबियांची भेट घेणार असून मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
‘भाजपचा स्थापना दिवस…झुंबड वाढली पण् मुख्यमंत्र्यांच्या काकू संतापल्या’, नेमकं काय घडलं?
तसेच टॅक्ससंदर्भात एका हॉस्पिटलला एक कायदा, दुसऱ्या हॉस्पिटलला दुसरा कायदा. सर्वांना नियम कायदा सारखाच असला पाहिजे. मला आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत, पण डेटा हवा आहे,. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सेवा दिली पाहिजे, आपल्या देशात चांगले डॉक्टर आहेत. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंगेशकर कुटुंबियांना मदत करण्यात आली. त्यानंतर हे हॉस्पिटल उभारले आहे, मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबियांची माफी मागितली तरी कमी असल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलंय.
गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी डॉ.घैसास यांचा राजीनामा…
राज्यभरातून या प्रकरणावर मोठा आवाज उठवण्यात आला होता. विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील या प्रकरणी आक्रमक झाले होते. सामाजिक संस्थांकडून रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून राजीनाम्याची मागणी होत होती. त्यामुळे रूग्णालय प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर तनिषा भिसे यांच्यावर अगोदर पासून उपचार करत असलेले आणि ऐन प्रसृतीच्या वेळी त्यांना पैशांसाठी उपचार नाकारणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.