MP Medha Kulkarni : मी कुठेही दर्ग्यात प्रवेश केलेला नाही, आरोप करणाऱ्यांनी व्हिडिओ समोर आणावा, असं स्पष्टीकरण राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) यांनी दिलंय. पुण्यात हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिराबाहेरील दर्ग्यात मेधा कुलकर्णी यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीकडून करण्यात आलायं. या आरोपांवर कुलकर्णी यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय.
गुंतवणूकदारांची मज्जा, भारतीय शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’; सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढला
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आमचा सण होता, त्या दिवशी मी हनुमान मंदिरात कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी समोरील दर्ग्यातील ठिकाणच्या मशीदीमध्ये अजान होती. दर्गा सोडून ते लोकं बाहेर उभे होते. मी याबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी बोलले. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. मी दर्ग्यात प्रवेश केलेला नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आणावा, असं प्रत्युत्तर खासदार कुलकर्णी यांनी दिलंय.
ही घटना दि. 13 एप्रिल रोजी घडलीयं. त्यानंतर आता ही गोष्ट समोर आलीयं. एवढ्या वेळेत काहीतरी घडलं आहे. मी असुरक्षित आहे, आता माझ्या सुरक्षेत वाढ करावी, माझी गाडी रस्त्यावर टलागलेली होती. आम्ही त्या ठिकाणी आवाज कमी करण्याची मागणी केली असल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.
वक्फ बोर्ड कायदा संविधानानूसार तयार झालायं – खासदार कुलकर्णी
वक्फ बोर्ड कायदा संविधानानूसार तयार झाला असून लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात पारित झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज जे मुद्दे दिले आहेत, त्यावर सात दिवसांच्या आत शासनाने आपले म्हणणे मांडावं असं सांगितलं, त्यावर शासन आपलं म्हणणं मांडणार असल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.