गुंतवणूकदारांची मज्जा, भारतीय शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’; सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढला

गुंतवणूकदारांची मज्जा, भारतीय शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’; सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढला

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजार पुन्हा एकादा वाढताना दिसत आहे. जागतिक बाजारात घडणाऱ्या घटनांमुळे भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मोठी घसरण दिसून येत होती मात्र आता पुन्हा एकदा बाजारात तेजी दिसून येत असल्याने गुंणतवणूकदार मोठ्या प्रमाणात बाजारात गुंतवणूक करत आहे. आज 17 एप्रिल गुरुवार रोजी सेन्सेक्स (Sensex) 1500 अंकांनी वाढून 78,553 वर पोहचला आहे तर निफ्टी (Nifty) 414 अंकानी वाढून 23851. 65 वर पोहचला आहे. या वाढीसह, बीएसईवर लिस्टींग कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 418.98 लाख कोटी रुपये झाले.

आज सकाळी बाजाराची सुरुवात चांगली नव्हती मात्र त्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. उद्या 18 एप्रिल (शुक्रवार) रोजी गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. आज आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज लॅब्स, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स, सिप्लाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर निफ्टीमध्ये विप्रो, टेक महिंद्रा, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, टाटा स्टील हे शेअर्स घसरले.

बँकिंग शेअर्समध्ये वाढ

आज बँक निफ्टी हा सर्वात जास्त वाढणारा निर्देशांक होता, जो जवळजवळ 2% वर होता. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक सारख्या शेअर्समध्ये आज चांगली खरेदी पाहायला मिळाली. 19 एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या चौथ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

वक्फ बोर्ड कायदा जैसे थे! सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला धक्का, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी एकत्रितपणे सेन्सेक्सच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावरून या बँकांची कामगिरी बाजारासाठी किती महत्त्वाची आहे हे दिसून येते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube