Medha Kulkarni : लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णी आता हिंदुत्वाचा चेहरा होणार?

Medha Kulkarni & Hindutva Face हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडण्यात महेश लांडगे, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांची नावे विशेषतः घेतली जातात.

लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णी आता हिंदुत्वाचा चेहरा होणार?

लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णी आता हिंदुत्वाचा चेहरा होणार?

Medha Kulkarni Will Be The Face Of Hindutva Face Like Landge, Jagtap & Rane? : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्व हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे. अनेक नेते आपल्या कार्यशैलीतून आणि वक्तव्यांतून हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडताना दिसतात. त्यामध्ये महेश लांडगे, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांची नावे विशेषतः घेतली जातात. या यादीत आता भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचीदेखील वर्णी लागण्याची चिन्ह आहेत. कारण भाजप नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकांमुळे प्रकाशझोतात आल्या आहेत. कुलकर्णी यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकांमुळे लांडगे, जगताप आणि राणे यांच्याप्रमाणे मेधाताई हिंदुत्त्वाचा चेहरा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भगवी टोपी भगवा पंचा बदलता पेहराव…तनपुरे भाजपच्या वाटेवर?

मेधा कुलकर्णी अन् कट्टर हिंदुत्त्व

मेधा कुलकर्णी यांची प्रतिमा संघपरिवाराशी जवळीक असलेल्या आणि हिंदुत्व विचार मांडणाऱ्या नेत्या म्हणून आधीपासून आहे. राम मंदिर, सांस्कृतिक विषय, इतिहास, शिक्षण या मुद्द्यांवर त्या ठाम भूमिका घेतात. त्यामुळे पक्षात त्यांची ideological leader अशी प्रतिमा आहे. तर, महेश लांडगे, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांची प्रतिमा आक्रमक आहे. त्याउलट मेधा कुलकर्णी यांची शैली जास्त करून वैचारिक, संघटनात्मक आहे. कुलकर्णी यांची पक्षातील छबी जरी आयडोलॉजीकल लीडर अशी असली तरी, कट्टर हिंदुत्त्वाची भूमिका आणि मेधा कुलकर्णी यांचे कनेक्शन जुनं आहे.

नामांतर, बॅनरबाजी अ्न पत्रकार परिषदेमध्ये खासदार मेधा कुलकर्णी भावूक; नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हातील मंचर येथे पांडवकालीन बारव असून, या ठिकाणी प्रत्यक्ष शिलालेख, गोमुख, दगडी बांधकाम यांवरून येथील हिंदू पद्धतीच्या बांधकामाचे पुरावे मिळतात. अशा ठिकाणी काही वर्षांपासून अनधिकृत दर्गा बांधण्यात येऊन आणि वक्फ म्हणून जाहीर करण्यात आला. या विरोधात मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी नुकतीच शुक्रवारी (दि.6) मंचरमधील या ठिकाणाला भेट देत वादग्रस्त ठरलेल्या दर्ग्याची आणि पांडवकालीन बारव परिसराची पाहणी केली. पाहणी दरम्यान वादग्रस्त भागामध्ये कुलकर्णी यांना नव्याने काही काम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या आक्रमक झाल्या आणि स्वतःसोबत आणलेल्या देवी-देवतांचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मी दर्ग्यात प्रवेश केलेला व्हिडिओ समोर आणा; खासदार मेधा कुलकर्णींचं आरोपांवर प्रत्युत्तर

पुणे स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी

मंचर प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेण्याची मेधा कुलकर्णी यांची पहिलीच वेळ आहे का? तर नाही, काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या पुणे स्टेशनच्या नावावरून मोठं राजकीय वावटळ उठलं होतं. यामागेदेखील मेधा कुलकर्णीच होत्या. मेट्रोचं पुणे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. कुलकर्णी यांच्या या मागणीनंतर पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

मेधा कुलकर्णी यांनी मेट्रोच्या पुणे स्थानक स्टेशनच्या नाव बदलाच्या मागणीनंतर शहरभर पोस्टर वॉर सुरू झालं होतं. कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर झळकवण्यात आले होते. या बॅनरमध्ये ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर, बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!’ असा मजकूर लिहिलेला होता.

मोठी बातमी! धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर, कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरणास अटकेच्या तरतुदीची शक्यता

शनिवारवाड्यातील सामूहिक नमाज पठणावरून आक्रमक भूमिका

पुणे स्टेशनच्या नावाचा वाद शमत नाही तोचं काही महिन्यांपूर्वी पुण्यातील शनिवारवाड्यात काही महिलांचा सामूहिक नमाज पठन करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुलकर्णी यांनी पतीत पावन संघटनेला सोबत घेत शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या ठिकाणी सामूहिक नमाज पठन करण्यात आले त्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करायचे आहे, असा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांकडून त्यांना शनिवारवाड्यात जाण्यास मनाई केली होती.

एकूण पाहता, महेश लांडगे, संग्राम जगताप नितेश राणे हे सर्व नेते वेगवेगळ्या भागांतून उदयास आलेले आहेत. त्यांच्या राजकीय शैलीदेखील वेगवेगळ्या आहेत मात्र, हिंदुत्वाशी संबंधित थेट आणि आक्रमक भूमिका मांडण्यात ते आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यातील सध्याच्या राजकीय चर्चांमध्ये या तिघांचे नाव वारंवार घेतले जाते. त्यात आता खासदार मेधा कुलकर्णी यादेखील आक्रमकपणे हिंदुत्त्वाबाबत भूमिका मांडत आहेत त्यामुळे, लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णीदेखील हिंदुत्वाचा चेहरा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Exit mobile version