नामांतर, बॅनरबाजी अ्न पत्रकार परिषदेमध्ये खासदार मेधा कुलकर्णी भावूक; नेमकं प्रकरण काय?

Medha kulkarni : पुणे रेल्वे स्टेशनच्या नामंतरावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप (BJP) नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र यानंतर सोशल मीडियावर खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांना ट्रोल करण्यात आले. अनेकांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणी विरोधात विरोध दर्शवत आंदोलनही केले. तर पुण्यातील बुधवार पेठेस मस्तानीचं नाव द्या अशा आशयाचे बॅनर देखील काही ठिकाणी लावण्यात आले होते. तर आता या प्रकरणात प्रतिक्रिया देत खासदार मेधा कुलकर्णी भावूक झाल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्टेशनच्या (Pune Railway Station) नावावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली. तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीनंतर पुण्यातील अनेक भागात मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले. या बॅनरमध्ये ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!’ असा मजकूर लिहिण्यात आले. आज या बॅनरवर प्रतिक्रिया देत खासदार मेधा कुलकर्णी पत्रकार परिषदेमध्ये भावूक झाले.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे स्टेशनला सध्या नावच नाही. त्यामुळे आपण नाव देऊ शकतात. बाजीराव पेशवे भूषणवाह नाव आहे, त्यामुळे ते नाव द्या असे मत मी मांडले होते आणि कोणीही आपले मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता? असं म्हणत खासदार मेधा कुलकर्णी भावूक झाल्या. आम्ही फक्त नाव द्या अशी मागणी केली पण निर्णय घेणारे लोक वेगळे आहे.आमच्यावर टीका देखील होऊ शकते पण एक लेव्हल ठेवा. असं या पत्रकार परिषदेमध्ये खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
मी जगभरात साडी नेसून गेले, माझे पोस्टर लावले मला खूप वाईट वाटले, अश्लील लावले, काळ सोकावू नये म्हणून तशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली.