पुणेः माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येरवडा येथील पोलीस विभागाची जमिन ही बिल्डरला हस्तांतरीत करायची होती. त्यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार हे दबाव आणत होता, असा आरोप बोरवणकर यांचा आहे. या आरोपामुळे अजित पवार हे अडचणीत येऊ लागले आहेत. पण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे अजित पवारांच्या पाठीशी आहे. कुठेही तरी अजितदादांची भाजपला ताकद कमी करायची आहे असे वाटतेय, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
माध्यमांशी कमी बोला अन् काम लवकर करा : सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना सल्ला
रोहित पवार म्हणाले, यामागे अनेक पैलू असू शकतात. एक पैलू मी सांगितला आहे. दुसरा पैलू लोकांमध्ये चर्चेत आहे. अजितदादांची लोकांतील शक्ती आहे. अजित पवारांची कुठे तरी भाजप मुद्दामहून ताकद कमी करते आहे का ? अचानक हा मुद्दा पुढे केला जात आहे. त्यातून चर्चा सुरू झाली आहे. यावर अजितदादांना उत्तर द्यावे लागत आहे. भाजपकडून कोणीही बोलण्यासाठी पुढे येत नाहीत. याच्यातून हळूहळू अजितदादांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय का असे वाटत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवारांचा आहे.
Ajit Pawar : जागा तिथंच आहे, मग चौकशी कसली करता? अजित पवारांचा विरोधकांना सवाल
भाजपची प्रवृत्तीच ही आहे की लोकनेत्यांना संपावयचे.एकनाथ खडसे हे त्याचे उदाहरण आहे. तसेच फुंडकर, मुंडेंचा मुद्दा आहे. लोकनेत्यांची ताकद कमी केली जात आहे. पंकजाताईंना भाजपमध्ये संघर्ष करावा लागत आहे. जे नेते बाहेरून भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामध्ये मोहिते व इतर लोक आहेत. त्यांची ताकद संपविली जात आहे. भाजपला वाटते की स्पर्धा संपविले जाईल. परंतु महाराष्ट्र हे राज्य उत्तर प्रदेशसारखे नाही. नेता तुमच्याकडे आला म्हणजे लोक तुमच्याकडे आले असे होत नाही. लोक हुशार आहेत. कुठल्या लोकांशी प्रमाणिक राहायचे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. उत्तर प्रदेशमधील राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही ? असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.