Download App

Pune : आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट होता होता टळली, धंगेकर म्हणतात…

  • Written By: Last Updated:

विष्णू सानप, पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत समोरासमोर लढल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने-सामने येणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण आज पुण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात  आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट होता होता टळली. कारण हेमंत रासने हे रविंद्र धंगेकरांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमाला येण्यासाठी ५ मिनीटं उशीर झाला.

पण धंगेकरांना झालेल्या पाच मिनिटांच्या उशिरामुळे दोघांची एकत्रित भेट टळली असली तरी रवींद्र धंगेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. धंगेकर म्हणाले की आता आमचं राजकारणाचं युद्ध संपल़य आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालं आहे.

हेही वाचा : कसब्यातील पराभवाचा राग ब्राह्मण समाजावर! हिंदू महासंघाचा भाजपवर आरोप

मी स्वतःला भाग्यवान समजतो

यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले की मी स्वतःला भाग्यवान समजतो कि जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ जिथे रोवली आहे, त्या भागाचा मी आधी नगरसेवक होतो आणि आता आमदार म्हणून निवडून आलो आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घरातूनच मिळाले आहे, लहानपणापासून घरात, शाळेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले आहेत.

माझ्या आजवरच्या आयुष्यात मी दरवर्षी मिरवणुकीला हजर असतो, आजही मी विधानसभेतून आलोय. दरवर्षी भवानी माता मंदिरपासून मिरवणुकीला सुरुवात होते, त्या ठिकाणी मी आजही उपस्थित आहे. सामाजिक कामात मी राजकारण आणणार नाही

हेमंत रासने यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की आता आमच्यातील राजकारणाचं युद्ध संपल़य आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालंय, ते आम्ही हातात हात घालून सोबत लढू, गेले पंधरा वर्ष आम्ही सभागृहात सोबत काम केले आहे, असं म्हणत त्यांनी त्यांनी महापालिकेतील सोबतीची आठवण करून दिली.

Tags

follow us

वेब स्टोरीज