Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफ धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा (Mumbai Police) तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) मोठा खुलासा केला आहे. सैफ अली खानला धमकी आल्याचा कुठे उल्लेख नाही. कधी धमकी आलेली नाही. या प्रकरणाला विरोधी पक्षांकडून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मंत्री कदम म्हणाले आहेत.
Video: घरात जाताना बिना चप्पल अन् बाहेर येताना बुट घालून; सैफच्या इमारतीतला नवा सीसीटीव्ही समोर
कदम पुढे म्हणाले, सैफ अली खानने मागणी केली तर त्यांना सुरक्षा देण्यासाठी विचार केला जाईल. या प्रकरणात ज्याला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याचा कोणत्याही गँगशी संबंध नाही. तो व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात शिरला होता. यानंतर अभिनेता शाहरुख खानच्याही घराची रेकी केल्याचे समोर आले होते. यावरही मंत्री कदम यांनी भाष्य केलं आहे.
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराची रेकी केली गेली अशी कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. पदभार स्वीकारल्यानंतर आज माझा पुण्याचा हा पहिलाच दौरा आहे. पुणे आयुक्तालयाचाही मी आढावा घेतला. मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या 100 दिवसांच्या आराखड्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याची माहिती घेतली असे कदम यावेळी म्हणाले.
दरम्यान, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या तपासादरम्यान घराबाहेर योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर वांद्रे पोलिस स्टेशनच्या आसपास दिसला. मात्र, शुक्रवारी सैफवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
रक्तानं माखलेलं शरीर अन् सोबत चिमुकला तैमूर, डॉक्टरांनी सांगितलं सैफ हॉस्पीटलमध्ये आला, तेव्हा..