रक्तानं माखलेलं शरीर अन् सोबत चिमुकला तैमूर, डॉक्टरांनी सांगितलं सैफ हॉस्पीटलमध्ये आला, तेव्हा…

रक्तानं माखलेलं शरीर अन् सोबत चिमुकला तैमूर,  डॉक्टरांनी सांगितलं सैफ हॉस्पीटलमध्ये आला, तेव्हा…

Saif Ali Khan Came With Taimur In Lilavati Hospital : लीलावती हॉस्पिटलचे (Lilavati Hospital) डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी आज सैफ अली खानसंदर्भात मोठं अपडेट दिलंय. ते म्हणाला की, सैफ अली खान जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा मी त्याला पहिलं होतं. सैफच्या शरीरातून पूर्ण रक्त वाहत होतं. सैफ एखाद्या ( Saif Ali Khan) सिंहासारखा चालत आला. सहा ते सात वर्षांचा त्यांचा लहान मुलगा तैमूर सैफसोबत होता. तो चालत आला. सैफ रिअल हिरो आहे. चित्रपटांमध्ये हिरोगिरी करणे शक्य आहे, पण स्वत:च्या घरात हल्ला होत असताना इतकं धाडस दाखवणं, ही खऱ्या हिरोची ओळख आहे.

Saif Ali Khan Health Update : सैफला बरा होण्यास..; मेडिकल बुलेटिन जारी करत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे सैफ अली खानला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिलाय. ते म्हणाले की सैफ 2 मिमीने वाचले. चाकू जर अजून 2 मिमी खोल शिरला असता, तर अजून गंभीर इजा झाली असती. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, तैमूरसोबत सैफ हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरशिवाय आला होता.

दरम्यान सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका संशयिताला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित गुरुवारी रात्री उशिरा अभिनेत्याच्या अपार्टमेंटच्या अग्निसुरक्षा एक्झिट पायऱ्या उतरताना दिसला. मात्र, सैफवर हल्ला करणारा तोच संशयित होता का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ला आणि चोरीप्रकरणी पोलीस संशयिताची चौकशी करत आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

VIDEO : सोनेरी डोळे अन् सावळा रंग, महाकुंभात आणखी एक ‘सुंदरी’…गर्दीचं वेधलं लक्ष

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांनी 35 टीम तयार केल्या आहेत. यामध्ये मुंबई क्राईमच्या 15 टीम आणि मुंबई स्थानिक पोलिसांच्या 20 टीम्सचा समावेश आहे. गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमही शोधकार्यात मदत करत आहे. आरोपी 1 कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे घरातील नोकराने आपल्या जबाबात म्हटले आहे.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या तपासादरम्यान घराबाहेर योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर वांद्रे पोलिस स्टेशनच्या आसपास दिसला. मात्र, शुक्रवारी सैफवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube