एव्हरग्रीन अभिनेता सैफ अली खान : वाढदिवसानिमित्त जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

- सैफ अली खानचा जन्म 16 ऑगस्ट 1970 ला दिल्लीमध्ये झाला. तो एका शाही आणि चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतो. त्याचे वडिल मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन होते. तर त्याची आई शर्मिला टागोर या हिंदीतील प्रसिद्द अभिनेत्री आहे. याच एव्हरग्रीन अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्त जाणून घेऊ त्याचा जीवन प्रवास…
- सैफने त्याचं शिक्षण लॉरेन्स स्कूल, सनावर त्यानंतर यूकेतील लॉकर पार्क स्कूल आणि विनचेस्टर कॉलेज मध्ये केलं. पण त्याला अभ्यासात जास्त आवड नव्हती हे त्याने अनेकदा कबूलही केलं आहे.
- तर सैफच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर 1993 ला त्याने परंपरा चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. पण हा चित्रपट फ्लॉप झाला.
- त्या अगोदर तो राहुल रवैलचा चित्रपट बेखुदीमध्ये काजलसोबत पदार्पण कऱणार होता. पण त्याला यासाठी त्याची गर्लफेंन्ड सोडण्याची मागणी केली गेली. पण त्याने तसे न केल्याने हा चित्रपट त्याच्या हातून गेला. असं स्वत: सैफने सांगितलं आहे.
- त्याचबरोबर पुढेही त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. 90 च्या दसकात त्याचे अनेक चित्रपटच फ्लॉप झाले. ज्यामध्ये आशिक आवारा, पहचान यांचा उल्लेख करता येतो.
- पण 1994 ला आलेला ‘ये दिल्लगी’ , ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ ने त्याला ओळख दिली. 1999 मध्ये ‘कच्चे धागे’, ‘हम साथ-साथ हैं’ ने त्याच्या करिअरला दिशा दिली.
- तर त्यानंतर आलेले ‘दिल चाहता है’ ,‘कल हो ना हो’ ,‘हम तुम’ या चित्रपटांनी त्याला रोमॅंटीक हिरो म्हणून ओळख दिली. ‘हम तुम’ साठी त्याला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला.