पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या छत्रभूज नर्सी शाळेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune) येथे पालकाने आपल्या चालकासह फुटबॉलच्या मैदानावर जाऊन तीन लहान मुलांवर अमानुष मारहाण केल्याचा आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, पालकवर्ग आणि विद्यार्थी समुदायात एकच खळबळ उडाली आहे.
येथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या लोकांनी सांगितल्यानुसार संबंधित पालक आपल्या ड्रायव्हर/बॉडीगार्डसह थेट फुटबॉलच्या मैदानावर आहे. त्यांनी येथील ७ ते ८ वर्षांच्या तीन मुलांना हात मागे धरायला सांगितले आणि आपल्या मुलाला त्यांच्या तोंडात मारायला लावली, तोंडात मारायला लावली, हा संपूर्ण प्रकार फुटबॉल प्रशिक्षक आणि इतर शिक्षकांच्या उपस्थितीत घडला. त्याचबरोबर मी तुला ठार मारीन, तुझे दात फोडीन, हाड मोडीन अशा धमक्या दिल्याचंही साक्षीदारांनी सांगितलं.
तक्रारींवर थेट उपाय! RPO पुणेचं ओपन हाऊस बनलं नागरिकांचं व्यासपीठ
संतप्त पालकांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागण्या
संबंधित पालक आणि त्यांच्या ड्रायव्हरला शाळेच्या परिसरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालावी.
अल्पवयी मुलांवरील हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवावा.
शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण पुनरावलोकन करून प्रवेशद्वारांवरील कमकुवत दुवे बंद करावेत.
शाळेने सार्वजनिक निवेदन देऊन “हिंसाचारास शून्य सहनशीलता” धोरण स्पष्ट करावं.
एका पालकाने संताप व्यक्त करत म्हटले, पालक आणि शाळा यांच्यातील विश्वास तुटला आहे. जर आपल्या मुलांचं शाळेतच रक्षण होत नसेल, तर ते सुरक्षित कुठे असतील?
शाळेच्या प्राचार्यांनी हा प्रकार कबूल केला असून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता सगळ्यांचं लक्ष शाळा व्यवस्थापनाकडं लागलं आहे की ते या घटनेवर ठोस, पारदर्शक आणि कठोर भूमिका घेणार का, की पुन्हा दबावाखाली येऊन शांत राहणार?