Download App

Sharad Pawar : मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर; BJP आणि निवडणूक आयोगावर पवारांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) आणि भाजपविषयी मोठं विधान केलंय. पुण्यातील अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधत असताना भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा दावा करण्यात आला.

भाजपसाठी कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांनीही कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात सहभागी होऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही आज शरद पवारांनी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होऊन मेळावे घेतला. यावेळी त्यांनी देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जातोय. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, अशा बोचरी टीका भाजपवर केली आहे.

कसब्यातील अल्पसंख्यांक मेळाव्याला संबोधित करतांना पवारांनी सांगितले की, ‘समाजात एकोपा खूप महत्त्वाचा आहे. कुणी काहीही अफवा पसरवतील, त्याकडे दुर्लक्ष करा. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर एकता ठेवणारं शहर आहे. येथील अल्पसंख्याक समुदाय कायम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीसोबत राहिला आहे. देशात सध्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजपकडून राजकीय पक्षांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरही आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर होतो. शिवसेना एकाच्या हातून काढून दुसऱ्याच्या हाती देण्याचं काम केलं गेले. शिवसेनेची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांनी सहकाऱ्यांना सागितले की माझ्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्या मुलाच्या हातात दिली नाही. निवडणूक आयोगाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण आपण बघितलं आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, देशात सध्या भाजपची सत्ता आहे. अगोदर अनेक पक्षाची सत्ता होती. पण मोदी यांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यात सर्व देश ताब्यात हवा असे आहे. याचा सगळ्यात जास्त फटका अल्पसंख्यांक समाजाला बसत आहे.

BJP नेत्यांसमोरच कुमार विश्वास यांची संघावर टीका; म्हणाले, आरएसएस निरक्षर

कसब्यातील मतदारांना आवाहन करत पवार म्हणाले, आता आपल्या सगळ्यांना एकत्र यावे लागेल. कसबा निवडणूक खूप महत्वाची आहे. समाजात भाईचारा, एकोपा कसा ठेवायचा हे रवींद्रकडे बघून कळते. कुणी काहीही अफवा पसरवेल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. या निवडणुकीवर लक्ष द्या, असे आव्हान पवारांनी यावेळी उपस्थितांना केले.

 

Tags

follow us