Download App

ललित पाटीलप्रकरणात भाजप मंत्र्याचा हात; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

  • Written By: Last Updated:

पुणेः ससूनमधील हॉस्पिटलमधील (Sasoon Hospital Drug Racket) ड्रग्ज विक्री व ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू लागले आहेत. या प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या निशाणावर आले आहेत. त्यात पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी (Mla Ravinda Dhangekar) भाजपवर एक खबळजनक आरोप केला आहे. ललित पाटील याला पळवून जाण्यास भाजपचा एक आमदार व मंत्र्याचा हात असल्याचा आरोप धंगेकरांचा आहे. त्याला अद्याप भाजपने उत्तर दिलेले नाही.

440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’

पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि सध्या मंत्री असलेला. ज्यांचा महाराष्ट्रातील गुन्हेगारांमध्ये वावर आहे. त्यांचाही यात हात असल्याचे काही दिवसात दिसेल. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब याबाबत कारवाई करायला हवी. गेल्या आठवड्यात ललित पाटील हा ससूनमधून पळून गेला आहे. याचे सर्व कंगोरे बघितले तर तुरुंग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल अधिकारी, ससून हॉस्पिटलचे डीन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. नऊ महिने ललित पाटीलवर काय उपचार केले. कोणते उपचार केले याचे समाधानकारक उत्तर दिले जात नाही.


मुंबईत MMRDA इमारतीच्या पार्किंगमधील कारमध्ये बॉम्ब? परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल

ललित पाटील हा पळून गेल्यानंतर रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याच्या प्लॅटमध्ये राहिला आहे. त्याच्या चालकाने ललित पाटीलला मदत केली आहेत. चित्रफितीमध्ये ललित पाटीलचा सासत्याने प्लॅटमध्ये वावर होता, असे दिसून येत आहे. याप्रकरणात ससूनचे डीन यांनासह आरोपी करावे, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. ससूनच्या डीनची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. परंतु या समितीत नेमलेले लोक ही डीनच्या समकक्ष आहेत. त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी कशी होईल, असा प्रश्नही रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केला आहे.

पंजाबनंतर पुण्यामध्ये ड्रग्जची तस्करी सुरू झाली आहे. अनेक पबमध्ये ड्रग्जची विक्री केली जात आहे. आज पुण्यात बाहेरून येऊन चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे ड्रग्ज पुरवठा कसा होता. ते रोखण्यासाठी गृहमंत्र्यांनी उपाययोजना करावी, अशी मागणीच रवींद्र धंगेकरांनी केली आहे.

Tags

follow us