Download App

ललित पाटीलला महिला पुरवल्या जायच्या, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ…; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा

  • Written By: Last Updated:

Ravindra Dhangekar on Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा ससून रुग्णालयात पोलिसांना (police) गुंगारा देऊन फरार झाला. या घटनेला आज नऊ दिवस झाले. मात्र पोलिस अद्यापही त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अशातच या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अतिशय गंभीर आरोप केला आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला महिला पुरवल्या जात होत्या, असा आरोप त्यांनी केला.

राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली; लग्न अन् सामाजिक कार्यक्रम ठरले विघ्न 

शेकडो कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील ललित पाटीलला फरार झाला. मात्र, पोलिसांनी त्याच्या भावाला अटक केली आहे. याप्रकणात राजकीय नेत्यांनी उडी घेतली. सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केला. ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केला.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला महिला पुरवल्या जात होत्या. तो व्हिडिओ मी समोर आणणार आहे. हॉटेलवर जाण्याआधी तो कोणाला भेटला. हॉटेलवर तो कोणाला भेटायला जायचा, हे सर्व त्या व्हिडिओत आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केली. धंगेकर यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले, ललित पाटीलसारखा गुन्हेगार ससूनमध्ये राहत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये बायका पुरवल्या जात होत्या. माझ्या दाव्यात 100 टक्के तथ्य आहे. तो तिथून पळून गेला. ज्या सोसायटीत तो पळून गेला, तिथे त्याचा फ्लॅट आहे. त्या ठिकाणी तो आदल्या दिवशी राहिला होता. त्या प्लॅटमध्ये महिला होत्या. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये तो कशाला जात होता? एका बंगल्यात ड्रग्ज माफिया कसा ठेवला जात होता, असा सवाल त्यांनी केला.

धंगेकर यांच्या या आरोपामुळे ससून रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवरच नव्हे तर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. धंगेररांनी आज पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यांनी लिहिलं की, पोलिसांना या गोष्टी माहीत आहेत. आपले उमलते फुल जाळू नका. काही करा, लहान मुलांवर लक्ष ठेवा. आमची मुलं आहेत, तशी तुमची मुलं आहे. 17-18 वर्षांची ही मुलं आहेत. ती ड्रग्जच्या आहारी जात आहेत. त्यांच्या घराखालीच जर गांजा आणि ड्रग्ज सापडत असतील तर चुकीचं आहे. आरोपीवर उपचाऱ करणाऱ्या डीनसह जेवढे डॉक्टर आहेत, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी धंगेकरांनी केली.

या प्रकरणात पोलिस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद आहे. चौकीदाराच चुकीचं वागत असेल तर पुण्याची परिस्थिती चांगली राहणार नाही. पैसे खाण्यासाठी गुन्हेगारांना मोकळं सोडलं जात आहे. ललित पाटील प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असू शकतील. भारतातीही गुन्हेगार असतील, त्याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

Tags

follow us