Download App

‘कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, तेव्हा बाकीच्या भानगडीत न पडता…’; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray on Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shri Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. दरम्यान, आज राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं. २२ तारखेला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, कुणालाही त्रास न देता गावागावात आरती, पुजा करा, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

मुंबईमुळे ‘मविआ’त फाटणार? ठाकरेंकडील दोन विजयी जागांसह चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा 

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचा मेळावा पार पडला. पुण्यातील गणेश कला मंदिरात झालेल्या या मेळाव्यास मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शिरीष सावंत आदी उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करतांना भाषणाच्या शेवटी राज ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या दिवशी राम मंदिर होत आहे तेव्हा बाकीच्या भानगडीत पडू नका. मी इतकेच सांगेन की, कारसेवकांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते आता पूर्ण होत हे. मनसैनिकांनी कारसेवकांच्या आनंदात सहभागी व्हावे, जिथं शक्य होईल तेथे आरत्या किंवा अन्य कार्यक्रम दुसऱ्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने साजरे करा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

राम मंदिर सोहळा, शंकराचार्य अन् विरोध; जाणून घ्या हिंदू धर्मातील महत्त्व 

या मेळाव्याला मनसेचे राज्यभरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह जिल्हाध्यक्ष व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील स्थितीचा उल्लेख करत मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना गावांमध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. गावात चांगले वातावरण तयार केलं पाहिजे, ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांच्या बदल घेऊ नका, त्यांचीही काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

पुढं बोलतांना ते म्हणाले. तुमचं गाव, तुम्ही चांगलं, स्वच्छ ठेवा. गावातीला वातावरण बदला, चांगल करा… गावातील माता भगिणींना गावात राहावं असं वाटलं पाहिजे. मतदान केलं नाही, तरीही गावातील वातारवण चांगलं करा. तुम्हाला मत पडतील, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. ज्यांनी मतं दिली नाही, त्यालाही तुम्हाला मतं द्यावंसं वाटलं पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.

follow us