राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : राज ठाकरेंनी पुन्हा जुन्या वादाला फोडलं तोंड
Raj Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) हा जातीयवादी पक्ष आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सातत्याने केला. आताही त्यांनी पुन्हा एकदा जातीयवादावरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून स्वत:च्या जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा इतरांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे व्हायला लागलं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : राज ठाकरेंनी पुन्हा जुन्या वादाला फोडलं तोंड
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त राज ठाकरे आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, राज्यातील जाती-पातीच्या मुद्यांविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, जात ही अशी गोष्ट आहे जी अनेकांना प्रिय असते. अनेकांना आवडते. याची कारणे वेगळी आहेत. आपल्या जातीचा अभिमान बाळगण्याचे प्रकार महाराष्ट्रात आधीपासून होत होते. महाराष्ट्रात जात होतीच. हजारो वर्षापासून जात आहे. मात्र, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर स्वतःच्या जातीऐवजी इतर जातींबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. असं ते म्हणाले.
NIV Pune Bharti 2023: पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांची भरती, कोण करू शकतं अर्ज?
ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातींचा द्वेष वाढला. मी अनेकदा बोललो की, असंच होत राहिलं तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही. राजकीय नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्र खड्ड्यात ढकलला जात आहे. महाराष्ट्राची देशभर एक प्रतिमा आहे, त्या प्रतिमेची वाट लावण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.
तुम्ही जात मानत नाही, मात्र, तुमच्या पक्षात जातीवाद दिसतो. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, माझ्या पक्षात जातीपातीला थारा मिळणार नाही. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. तो कोणत्याही जातीचा असेना. चांगल्या ताकतीचा माणूस असेल तर मी जात पात पहात नाही. कोणत्याही जातीच्या माणसाने कोणत्याही जातीचे कल्याण केले, हे मला सांगा, त्या बोलायच्या गोष्टी असतात. मात्र, माझ्या पक्षात जातीपातीला थारा मिळणार नाही. असं असेल तर मी संबंधिताला पक्षापासून दूर ठेवेन, असं राज ठाकरे म्हणाले.
भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामल्लाचं मोफत दर्शन घडवू, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातल्या प्रचार सभेत दिलं. यावरून राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली. भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे नवे खाते उघडण्य़ाची सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामे केलीत यावर निवडणुका लढवा. रामाच्या मोफत दर्शनाचे आमिष कशाला दाखवताय. तुम्ही काय गोष्टी केल्यात त्यावर बोलणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.