Download App

Kasba byelection : राजसाहेबांचा आदेश आला तर आमची तयारी

पुणे – कसबा पोटनिवडणूक (Kasba byelection) लढवण्याची मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. बरेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांची मागणी मनसे शहराध्यक्ष म्हणून कोअर कमिटीसमोर मांडली आहे. कोअर कमिटी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी सांगितले.

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्याकडे अजून कोणी आलेलं नाही. भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. टिळक कुटुंबातील उमेदवार असेल तर याचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असे साईनाथ बाबर म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात मनसे कोअर कमिटीची बैठक पुणे शहर कार्यलयात झाली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

साईनाथ बाबर म्हणाले, आमची निवडणुकीची तयारी आहे. पण राजसाहेब ठाकरे यांनी निर्णय सांगतल्यानंतर पुढचं पाऊल टाकणार आहेत. मी शहराध्यक्ष म्हणून आणि आमचा विभाग म्हणून आमची शंभर टक्के निवडणूक लढण्याची तयारी आहे. 2009 आणि 2012 च्या निवडणुकीत चांगल्या पध्दतीने कसबा मतदारसंघात मनसेला मतदान झाले होते, असे साईनाथ बाबर म्हणाले.

मधल्या काळात राजसाहेबांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका मनसेसाठी फायद्याची आहे. भविष्यातील निवडणुकीत मनसेला या भूमिकेमुळे फायदा होईल, असे साईनाथ बाबर म्हणाले.

Tags

follow us