Download App

MPSC Exam 2023: हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट व्हायरल; आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

  • Written By: Last Updated:

MPSC Exam 2023: एमपीएससी घेत असलेल्या अनेक परीक्षांमध्ये काहींना काही गोंधळ होत असतो. आता मात्र या वर्षी होणाऱ्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती सार्वत्रिक झाली आहे. त्यानंतर एमपीएससीने खुलासा केला आहे. केवळ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे. त्याचे आधार कार्ड व इतर माहिती लिक झालेली नाही. तसेच प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही, असे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चंद्रकांतदादांचा अजब सल्ला ! कार्यकर्त्यांना म्हणाले, आता पैसे खर्च करा..

येत्या 30 एप्रिल रोजी एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. त्यापूर्वीच गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची माहिती हॅक झाली आहे. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

या परिक्षेचे हॉलतिकीट हे फक्त आयोगाच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांनाच काढता येते. त्यासाठी विद्यार्थी हा आयोगाचे लॉगिन आयडीवरून जाऊन हॉल तिकीट मिळवतो. दुसऱ्यांना हे हॉल तिकीट मिळविता येत नाही. विद्यार्थ्यांची माहिती कशी लिक झाली आहे, याचा शोध एमपीएसीकडून घेण्यात येत आहे.

Tags

follow us