Download App

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सदाभाऊ खोत यांनी नमवले; शेतकऱ्याचा जप्त केलेला टेम्पो सोडवला

  • Written By: Last Updated:

Mujora officer of Pune Municipal Corporation was bowed down by Sadabhau Khot : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं. शिवाय, पिकांना भाव नाहीत, त्यामुळं बळीराज कोलमडून पडला आहे. अशातच गरीब शेतकऱ्यांनी जर शहरात येऊन थेट शेतीमाल विक्री केली तर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहेत. एकीकडे शासनानेच विकेल ते पिकेल अशा प्रकारचे धोरण राबवलेले आहे. आणि दुसरीकडे काही अधिकाऱ्यांची टोळी मात्र शासन विरोधी कार्यवाही करत आहे. बार्शी येथील एका शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता. याच्या निषेधार्थ आज रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शनिवार वाडा ते महानगरपालिका असा मोर्चा काढला. या मोर्चात सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

दिवस रात्र कष्ट करून, रक्ताच पाणी करून काबाड कष्ट करणारा बार्शी तालुक्यातील तावडी येथील रमेश आरगडे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याचं पीक घेतलं होतं. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं आरगडे हे हडपसर येथील हायवेवर टेम्पो लावून कांदा विकत होते. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आयुक्त महादेव जगताप यांनी आरगडे या शेतकऱ्यावर कारवाई करत त्यांचा टेम्पो जप्त केला. शिवाय, आरगडे यांना जगताप यांनी 40 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. दरम्यान, टेम्पो सोडवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला गेले आठ दिवस पळवले जात आहे, असा आरोप करत खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने शनिवारवाडा ते पुणे महानगरपालिका पर्यंत आज मोर्चा काढून लक्षवेधी आंदोलन केले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर रयतने हे आंदोलन केले. या आंदोलनात खोत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी खोत यांनी प्रवेशद्वारावरच कांदा विक्री केला. त्यानंतर खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेटवरून उड्या मारत महापालिका भवनाच्या परिसरात प्रवेश केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं महापालिका प्रशासनची चांगचीच धांदल उडाली.

…तर सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; नाना पटोले आक्रमक

दरम्यान, आंदोलनाची आक्रमत पाहून प्रशासनाने एक शिष्टमंडळ बोलावून घेतले व संबंधित शेतकऱ्याचा टेम्पो कोणताही दंड न करता सोडण्याचे कबूल केले. त्यांतर तो शेतकरी संबंधित कार्यालयात टेम्पो सोडवण्यासाठी गेला असता टेम्पो सोडण्यासंबंधी कोणताही आदेश वरिष्ठांकडून आम्हाला आलेला नाही. त्यामुळं आम्ही टेम्पो सोडणार नाही, असं सांगून शेतकऱ्याची हकालपट्टी केली. हे सदाभाऊ खोत यांनी कळताच ते महानगरपालिकेच्या गेटवर गेले. त्यावेळी खोत यांना पोलीस प्रशासनाने गेटवरच रोखले. मात्र, आंदोलनाचा आक्रमक पवित्रा बघून पालिका आयुक्त यांनी संबंधित टेम्पो सोडण्याचे तात्काळ आदेश दिले. त्यानंतर अर्ध्या तासातच टेम्पो महानगरपालिकेच्या गेटवर येताच सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलाल उधळून टेम्पो शेतकऱ्याच्या ताब्यात दिला.

 

Tags

follow us