Download App

Pune : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून ; आरोपीला कर्नाटकातून अटक

  • Written By: Last Updated:

पुण्यातील खडकी येथील दारूगोळा कारखान्यात दुचाकीवरून कामाला निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा खून केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, रजनी राजेश बैकेल्लु (वय – ४४, बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

Pune Crime : आईवर शिवी, मित्रानेच मित्राला संपवलं…

सोमवारी (ता २४ एप्रिल) सकाळी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रजनी यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ते खडकीतील दारूगोळा कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्या निधनानंतर रजनी या पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीस लागल्या. तर, आरोपी हा रिक्षाचालक म्हणून काम करत होता. रजनी या कधी त्यांच्या दुचाकीने तर कधी रिक्षाने कामाला जात होत्या. यातून रजनी आणि नासेर यांची ओळख झाली होती. यातूनच नासेर हा रजनी यांच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र, रजनी यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नासेरने त्यांच्यावर हल्ला करण्याचे ठरविले. यातूनच हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी रजनी या आपल्या दुचाकीवरून कामाला जात असताना नासेर आणि साथीदाराने रजनी यांना अडविले. त्यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रजनी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर नासेर फरार झाला होता. मात्र, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच तांत्रिक तपासावरून तो कर्नाटकातील विजापूर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने विजापूर येथून आरोपी नासेरला ताब्यात घेतले आहे.

Amol Kolhe : उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा पण सगळ्याच गोष्टी राजकारणात आणल्या तर…

केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली असून पोलिसांकडून त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस नाईक संदेश निकाळजे, रूषीकेश दिघे, सुधीर अहीवळे, स्वाती म्हस्के यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम करत आहेत.

Tags

follow us