Pune Crime : आईवर शिवी, मित्रानेच मित्राला संपवलं…
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली होती. अखेर या हत्तेचा छडा पोलिसांनी लावला असून 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नक्षली हल्ल्याची आधीच होती माहिती; तरीही कोणाच्या चुकीमुळे 10 सैनिकांचा मृत्यू?
हकीमद्दिन बारोट (वय 66) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत बारोट यांचा मित्र असलेल्या महेश ओव्हाळ याला (वय 32) याला अटक केली आहे. आईवरून शिवीगाळ केल्याने हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोळी येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती.
एकनाथ शिंदेच्या ठाण्यात होणार मुख्यमंत्री कार्यालय; राज्याचा कारभार ठाण्यातूनही चालणार
मात्र, सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. मात्र, फारस काही हाती लागल नाही. दरम्यान, कोंढवा पोलिसांना हकीमुद्दीन यांचा खून त्यांच्या मित्रानेच केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महेश ओव्हाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे आरोपी आणि मयत दोघेही नेहमी मद्यपान करीत होते. रविवारी रात्री मद्यपान केल्यानंतर मयत व्यक्तीने आरोपीला आईवरून शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपीने डोक्यात फरशी मारून खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.