बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…

बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…

Pune-Mumbai highway Accident : मुंबई (Mumbai)-पुणे (Pune)महामार्गावर अपघात (Accident) सत्र बंद होण्याचं नावच घेत नाही. आजही पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 11 वाहनांची धडक होऊन ती एकमेकांवर चढली आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे.

बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…

मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. अद्यापपर्यंत सुदैवाने कोणतीही जीवितहाणी न झाल्याची माहिती समोर आली आहे. या विचित्र अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात 11 वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या आठवड्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यानंतर या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठी योजना हाती घेण्यात आली आहे. सुमारे 160 कोटी रुपये खर्चून संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ITMS म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि ‘एमएसआरडीसी’ने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी लवकरच सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube