Download App

खासदारकीसाठी मोहोळ मैदानात अन् स्पर्धेतून बाद झालेल्या मुळीकांची सूचक पोस्ट चर्चेत

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजपनं लोकसभेसाठी राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप पुण्यातून कुणाला संधी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मोहोळ यांच्या नावासह जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे नावदेखील चर्चेत होते. मात्र, त्यांना डावलतं भाजपनं मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आता मुळीक यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करू दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याची कुजबूज दबक्या आावाजात सुरू झाली आहे. (Jagdish Mulik Facebook Post After Out From Pune Loksabha Cadidate List )

मुरलीधर मोहोळ यांनी बाजी का मारली? जाणून घ्या पाच कारणे…

पुणे लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याची मोठी चर्चा होती. सुरुवातीला मेधा कुलकर्णी यांचे नावही शर्यतीत होते. परंतु कुलकर्णींची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर ही नावं स्पर्धेत होती. मात्र, देवधर आणि मुळीकांचा पत्ता कट करत भाजपनं मोहोळांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. त्यानंतर मुळीक यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

“मला दोन पक्षांच्या ऑफर, राज ठाकरेंचाही फोन आला होता”, पण… वसंत मोरेंनी सगळंच सांगितलं

मुळीक यांची पोस्ट नेमकी काय?

मुळीक यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार असून, पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद असे म्हणत जनतेच्या सेवेत कायमच असे मुळीक यांनी भावना व्यक्त करताना म्हटले आहे.


मुळीकांनी वडगाव शेरीत फुलवंल होतं ‘कमळ’

पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. तशा आशायचे बॅनर्सही शहरभर लावण्यात आले होते.
2012 मध्ये मुळीक यांनी पहिल्यांदा काँग्रेसचा अभेद्य किल्ला मानला जाणाऱ्या वडगाव शेरीतून नगरसेवक म्हणून निवडून येत या मतदार संघात पहिल्यांदा कमळ फुलवले होते. हा जुना विजय पक्ष कधीच विसरणार नाही असा ठाम विश्वास मुळीक समर्थकांना होता. आमदार झाल्यानंतर मुळीक यांनी शहराचा विकास करण्याबरोबरच 2017 मध्ये भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवकही निवडून आणत वडगाव शेरी भाजपचा बालेकिल्ला बनवला होता.

मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

शहराध्यक्ष पदाची संधी मिळताच मुळीक यांनी पुणे शहराचा विकास करत संपूर्ण शहरभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. कोरोना सारख्या कठीण काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर रुग्ण सेवेचे केलेले उल्लेखनीय कार्य मुळीक यांनी यशस्वीरित्या पार पाडले. याशिवाय मुळीक यांनी आधुनिक पुण्याच्या निर्मितीसाठी मेट्रो, नदीसुधार व सुशोभीकरण प्रकल्प, नदीपात्रातील शिवणे ते खराडी रस्ता, उड्डाणपूल, रस्ते, 24 तास पिण्याचे पाणी योजना या सर्व गोष्टींसाठी स्थानिक, राज्य तसेच केंद्र पातळीवर पुढाकार घेत यशस्वीपणे मार्गी लावण्यात मोलाची भूमिका निभावली.

मुळीक यांचे आतापर्यंतचे काम बघता लोकसभेसाठी त्यांनाचं उमेदवारी दिली जाईल असा ठाम विश्वास मुळीक यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्त्यांना होता. पण भाजपनं मोहोळ यांच्या गळ्यात खासदारकीसाठी माळ टाकल्याने मुळीकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुळीक यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्याची चर्चा आहे.

follow us