Nana Gaikwad & Ganesh Gaikawad : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चर्चेत असतानाच आता गायकवाड प्रकरण चर्चेत आलंय. राजेंद्र हगवणे यांचे मामा विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. सुनेच्या छळाप्रकरणी सध्या गायकवाड पिता-पुत्र नाना गायकवाड (Nana Gaikwad) आणि गणेश गायकवाड (Ganesh Gaikawad) तुरुंगात आहेत. त्यामुळे आता हे गायकवाड आहेत तरी कोण? याची चर्चा सुरु आहे.
CM फडणवीस अन् मुनगंटीवार बऱ्याच दिवसांनी निवांत भेटले; विधानसभा, लोकसभेनंतरची दरी मिटली….
गायकवाड पिता-पुत्र नेमके कोण?
नानासाहेब गायकवाड हे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. नानासाहेब गायकवाड हे सावकार आहेत. त्यांच्याविरोधात अनेक लोकांना तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
15 गुन्हे अन् 3 मकोका…
नाना गायकवाड यांच्याविरोधात पुण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्याने त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर नाना गायकवाडसह गणेश गायकवाडवर पोलिसांनी तीन मकोका कारवाई केलेली आहे. यासोबतच येरवडा कारागृहात असताना इतर कैद्यांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे गायकवाड पिता-पुत्रांना अमरावती कारागृहात हलवण्यात आले.