कुख्यात खासगी सावकार गायकवाडला पुणे पोलिसांचा दणका; तिसऱ्यांदा मोक्का !

  • Written By: Published:
कुख्यात खासगी सावकार गायकवाडला पुणे पोलिसांचा दणका; तिसऱ्यांदा मोक्का !

Notorious private lender Nanasheb Gaikwad family for the third time MCOCA ACT : पुणेः पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. खासगी सावकारी करताना अनेक गुन्हे करणाऱ्या नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय 73) याच्यासह त्याची पत्नी, मुलगा यांच्यावर पुणे पोलिसांनी (Pune police) मोक्कानुसार कारवाई (MCOCA ACT) केली आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबावर तिसऱ्यांदा मोक्कानुसार कारवाई झाली आहे.


मोठी बातमी! मद्य घोटाळ्याप्रकरणी Arvind Kejriwal यांच्या घरी ईडी धडकली

गायकवाड याची पत्नी नंदा (वय 68) मुलगा गणेश (वय 39) या तिघांविरोधात कारवाई झाली आहे. हे कुटुंब पुण्यातील औंध भागातील आहे. गेल्या वर्षी या तिघांनाही एका गुन्ह्यात अटक झालेली आहे. या टोळीचा प्रमुख नानासाहेब गायकवाड आहे. बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करणे. या टोळीकडून गुन्हे करण्यात येत होते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Loksabha Election : नो धंगेकर नो मोरे पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात वेगळचं नाव


दहा वर्षांत अनेक गुन्हे

गायकवाड कुटुबावर दहा वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे, फौजदारीपात्र कट रचणे, अनैसर्गिक संभोग करणे, ठकवणूक करणे, ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे, अडवणूक करणे, बेकायेदशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुख नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड व त्याचे टोळीविरूद्ध मागील १० वर्षांच्या कालावधीत एकापेक्षा अधिक दोषारोपपत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आलेले आहे.

श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’


गेल्या तीन वर्षांच्या गुन्ह्यांत मोक्का

गायकवाडविरुद्ध पुण्यातील चतुःश्रृंगी व हिंजवडी पोलिस ठाण्यात तीन वर्षांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हे दाखल आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube