Nasrapur Girl Death Case : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचे निर्घृणपणे हत्या केल्याची हादरविणारी घटना घडलीय. पीडितेचा मृतदेह अंत्यविधीला घेऊन जात असलेले नातेवाइक आणि ग्रामस्थ संतप्त झाले झाले आहेत. त्यांनी पुणे-बंगळुरू (Pune–Bengaluru Expressway) महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन नवले पुलावर सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्या, फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.
भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये (Nasrapur Girl Death Case) चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका 65 वर्षीय आरोपीला अटक केली. शुक्रवारपासून ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. त्यांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले होते. पुण्यात शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कार नेण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी संतप्त झालेले नातेवाइक आणि ग्रामस्थांनी पुण्यात नवले पुलावरच मृतदेह थांबवत आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आला आहे. मुलीला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच आरोपाला फाशीची शिक्षा द्यावी, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान पोलिस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून, ते आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आहे.
