Download App

मेधा कुलकर्णींविरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आक्रमक! दर्ग्यातील गोंधळासाठी अटकेची मागणी

Medha Kulkarni यांच्यावर विरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने थेट गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

National Conference for Minorities aggressive against Medha Kulkarni Demand for arrest for the chaos at the Dargah : पुण्यातील भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आक्रमक झाली आहे.त्यांनी त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात…

पीबीजी पुणे जॅग्वार्सला मिळाली मोठी ताकद, इजिप्तच्या दिना मेशरेफचा संघात समावेश

नेमकी घटना काय?

१३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुण्येश्वर मंदिरातील कार्यक्रमासाठी खासदार डॉ. मेधा कुलकर्णीं आल्या होत्या. यावेळी जवळच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात नमाजासाठी दिली जाणारी अजान रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतकचं नाही तर खासदार कुलकर्णी थेट दर्ग्यातील मस्जिदीत घुसल्या आणि तिथं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मेधा कुलकर्णींकडून स्थानिक मुस्लिम नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं व्हिडिओत दिसतंय. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळलाय. दरम्यान, या सर्व गोंधळापूर्वी मेधा कुलकर्णींनी आपल्या भाषणात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याविषयी चिथावणी देणारी विधानं केल्याचं बोललं जातय. यासंदर्भात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.

गुंतवणूकदारांची मज्जा, भारतीय शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’; सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढला

शहराची शांसतता धोक्यात आनण्याचा प्रयत्न निंदनीय: राहुल डंबाळे

हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकूचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारो वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली. हा संपुर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालणा देणारा असुन यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केले प्रकरणी कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अशी माहीतीही राहुल डंबाळे यांनी यावेळी दिली.

मात्र, अद्याप कुलकर्णी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.दरम्यान, या कुलकर्णींच्या कृत्यामुळं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस या प्रकरणी मेधा कुलकर्णींवर काय कारवाई करणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us