Download App

NDA कॅडेटचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू; महिनाभरताच सैन्यात होणार होता अधिकारी

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) चे कॅडेट कॅप्टन प्रथम गोरख महाले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी (18 ऑक्टोबर) उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. (National Defense Academy Cadet Captain pratham Gorakh Mahale passed away during treatment)

40 दिवसात होणार होते देशसेवेत रुजु :

प्रथम हे सायगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी होते. गोरख महाले आणि शितल महाले यांनी मुलाला अत्यंत अथक परिश्रमातून शिकवलं. प्रथम यांनीही आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत 10 व्या वर्षांपासूनच एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. 2021 मध्ये त्यांचे हे स्वप्न साकार झाले आणि त्यांची एनडीएमध्ये निवड झाली. तब्बल दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले होते, आणि पुढच्या 40 दिवसात भारतीय सेनेत लेफ्ट.कर्नल पदावर देशसेवेसाठी रुजू होणार होते.

Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस अ‍ॅक्टिव्ह; ललित पाटील प्रकरणात 2 महिला जेरबंद

मात्र 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी (18 ऑक्टोबर) उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. यासोबतच प्रथम यांचे देशसेवेचे स्वप्नही मातीमोल झाले.

येरवडा कारागृह; ललीत पाटील प्रकरणानंतर आणखी एका कैद्याकडे सापडले 25 ग्रॅम चरस

प्रथम यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही प्रथम यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. प्रथम यांच्या मृत्यूने एका प्रेरणादायी देशसेवेचा प्रवास आज थांबला. अत्यंत शांत, सुस्वभावी व निर्गर्वी गुणवंत चि. प्रथमला नियतीने आपल्यातून हिरावून घेतले असून हे दुःख न विसरण्यासारखे आहे. चि.प्रथमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना..! अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Tags

follow us