येरवडा कारागृह; ललीत पाटील प्रकरणानंतर आणखी एका कैद्याकडे सापडले 25 ग्रॅम चरस
Lalit Patil Drugs Case : ड्रग्जमाफिया ललीत पाटील हे प्रकरण गाजत असताना पुण्यातील येरवडा कारागृहात असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. येरवडा कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात आणले जात होते. त्याच वेळेला त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले आहे.
ह्या आरोपीला एका गुन्ह्यात सुनावणीसाठी हजर करायचे होते. येरवडा कारागृहातून त्याला पुणे सत्र न्यायालयात पोलीस घेऊन आले होते. सुनावणी झाल्यानंतर त्याला घेऊन जेव्हा पोलीस येरवडा कारागृहाच्या गेटवर पोहोचले. तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले. याचा अर्थ येरवडा कारागृह ते पुणे सत्र न्यायालय या दरम्यान त्याच्याकडे हे चरस सोपवले आहे. हे सर्व पोलीसांच्या बंदोबस्तात झाले आहे. हे असे जर होत असेल तर कैदी कारागृहात राहून उपयोग होतो काय? असा प्रश्न निर्माण होतो.
Israel Hamas War : अमेरिकेलाही युद्धाचा फटका! लेबनॉनमध्ये जमावाने US दूतावास जाळला
ललीत पाटील प्रकरण पुण्यात गाजत असताना हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कारागृहात खरंच कैद्यांवर लक्ष दिले जाते का? त्यांना सुधारणेसाठी ठेवलं जात की कारागृहचं गुन्ह्यांची केंद्र बनली आहेत. हा प्रश्न त्या निमित्ताने समोर आला आहे. ललीत पाटील देखील अटक होता, कारागृहात होता पण तिथून तो ड्रग रॅकेट चालवत होता. त्यामुळे या कारागृहात नेमकं काय चालतंय हे ठरवून व्यवस्थित बंदोबस्त करण्याची गरज आहे.