Sharad Pawar : माझी जात जगाला माहिती आहे; मराठा-ओबीसी वादावर पवारांचे सडेतोड उत्तर

बारामती : जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही. सर्व जगाला माझी जात कोणती आहे ते माहित आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा की कुणबी-मराठातून ओबीसी या वादावर सडेतोड भाष्य केले. ते बारामतीमध्ये पाडव्यानिमित्त आयोजित भेटीगाठी कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते […]

Letsupp Image   2023 09 02T174420.525

Letsupp Image 2023 09 02T174420.525

बारामती : जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही. सर्व जगाला माझी जात कोणती आहे ते माहित आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा की कुणबी-मराठातून ओबीसी या वादावर सडेतोड भाष्य केले. ते बारामतीमध्ये पाडव्यानिमित्त आयोजित भेटीगाठी कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. (National President of NCP Sharad Pawar made a scathing comment on the debate between Maratha or Kunbi-Maratha OBC)

शरद पवार मराठ्यांचे नाही तर ओबीसींचे नेते आहेत, तेच मराठा आरक्षणचे मारेकरी आहेत, असा आरोप राजमाता जिजाऊंचे 14 वे वंशज आणि लेखक नामदेव जाधव यांनी केला होता. सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ मागील काही दिवसांपासून शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला आणि निवडणूक प्रमाणपत्र व्हायरल केले जात होते. यातही शरद पवार यांच्या नावापुढे ओबीसी संवर्ग असल्याच दाखवत ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सगळा बालिशपणा! शरद पवारांचा कुणबी दाखला अन् OBC दाव्याला सुप्रिया सुळेंनी फटकारलं

काय म्हणाले शरद पवार?

याच वादावर शरद पवार म्हणाले, तो दाखला मी बघितला. जिथे माझे शिक्षण झाले तिथलाच तो दाखला आहे. त्यातील जात, धर्म वगैरे लिहिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा इंग्रजीमधील दाखला फिरवला. त्यात ओबीसी लिहिले. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे. पण जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपू शकत नाही. सर्व जगाला माझी जात कोणती आहे, ते माहिती आहे. पण जात याविषयावर मी कधी समाजकारण आणि राजकारण केले नाही आणि करणारही नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी जो हातभार लावायचा तो मी लावेल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार मराठाच! थेट पुरावा दाखवत ‘OBC’ असल्याचा दावा समर्थकांनी खोडला

मराठी विरुद्ध ओबीसी वाद नाही :

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाही, असं माझं स्वतः मत आहे. मात्र काही लोक तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य लोकांना यातमध्ये रस नाही. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे एवढचं त्यांचं मत आहे. मग तो ओबीसी असो की मराठा असो, त्यांचे न्याय प्रश्न सुटले पाहिजेत, असेही मत पवार यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन दिले आहे :

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. मराठा तरुणांची भावना तीव्र आहेत. सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे देखील पवार म्हणाले.

Exit mobile version